Gajana Maharaj

॥ गण गण गणांत बोते ॥

मंदिराचा पूर्व इतिहास

सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात माझा जन्म. आई वडील शेती करणारे. पूर्वीपासून घरात श्री खंडोबाचे भक्त व पूजक. तसे माझे सर्वस्व म्हणजे जेजुरी चे कुलदैवत श्री खंडोबा. या देवाची पूजा अर्चा करूनच शाळेत जाण्याचा माझा दिनक्रम असायचा पण कोणास ठाऊक सन २००० मध्ये मात्र थोडे माझ्या बाबतीत वेगळे झाले. घटना अशी झाली कि जानेवारी २००० मध्ये माझ्या मोठ्या बहिणीचे आकस्मिक निधन झाले. तिचे घरातील सामान काढताना मला देवघरात खंडोबाचा टांक व श्री गजानन महाराज यांची छोटी प्रतिमा सापडली. पूर्वीपासूनच देवभक्त असल्याने मी त्या दोन्ही मूर्ती माझ्या देवघरात ठेवल्या. श्री गजानन महाराज यांच्या बद्दल मला पुसटशी कल्पना देखील नव्हती. हे महाराज कोण, कुठे राहतात, यांचे काहीच माहिती नव्हती. परंतु नित्यनेमाने मात्र मी त्यांच्या मूर्तीला आंघोळ, पूजा करूनच कॉलेजात जात होतो. अशीच दोन वर्षे गेली. अचानक एकदा एका वयस्कर सद्गृहास्ताने मला महाराजांची पोथी (श्री. गजानन विजय) वाचायला दिली. मी आवडीने रोज एक अध्याय वाचून कॉलेजात जात होतो. पण पोथी का वाचतात किंवा त्याचे पारायण का असते हे मला माहित नव्हते. मात्र माझी दैनंदिन पूजा चालूच असायची. असे करता करता साल २००५ उजाडले.

एके दिवशी पहाटे महाराजांनी मला स्वप्नात आदेश दिला कि मला तुझ्या कडे यायचे आहे. मला कदाचित भास झाला असेल असे समजून मी आधी दुर्लक्ष केले. दुसऱ्या दिवशी पुन्हा पहाटे महाराजांनी आदेश दिला कि मला तुझ्या कडे यायचे आहे. आता मात्र मला कुतूहल वाटू लागले. मी तरी महाराजांना अजून पहिले नाही किंवा त्यांची पूर्ण माहिती सुद्धा मला माहित नाही मग महाराजांना माझ्याकडे का बरे यायचे आहे. तिसऱ्या दिवशी मग दैनंदिन पूजा करताना महाराजांना स्पष्ट बोललो कि, अजून तुम्हाला मी पहिले नाही, मग महाराजानी मला पहाटे साक्षात दर्शन देऊन कामाचे स्वरूप समजावून सांगितले. महाराजांचे ते साक्षात रूपाचे दर्शन अजूनही माझ्या अंतरंगात विसावलेले आहे. (समाधीवर महाराज बसलेले आहेत. हात गुढग्यापर्यंत आजानुबाहू स्वरूपात, सावळे साजिरे गोड रूप, किंचित मुखावरती हास्य.)

आता महाराज मला सांगतात कि तुला दर्शन दिले आहे. आता तू मला स्थानापन्न कर. मग मी माझ्या कुलपुरोहित अण्णा यांच्याकडे गेलो. (अण्णा हे टोपण आहे त्यांचे मूळ नाव सूर्यकांत श्रीधर मानकामे). अण्णांना मी सर्व घडलेली हकीकत सांगितली व महाराजांनी मंदिराचे आदेश दिले आहेत असे बोललो. पण मंदिर बांधायचे म्हंटले कि आर्थिक नियोजन आले. आणि तशी माझी परिस्थिती बिकटच. (कॉलेजात जाताना रोजचे मला अवघे १० रुपये वडिलांकडून मिळत होते.) पुन्हा मी महाराजांना बोललो कि मंदिर बांधायची माझी आर्थिक कुवत नाही. त्यावर महाराजांनी पुन्हा स्वप्नादेश दिला कि तू चिंता करू नकोस. मला फक्त चौथरा बांधून दे. बाकीचे मी सगळे बघतो. मग गावातल्या काही लोकांना जवळ करून २००६ मध्ये "श्री गजानन महाराज भक्त मंडळ" याची स्थापना केली. तसेच वडिलांनी माझा महाराजांविषयीचा असलेला भक्तिभाव बघून त्यांच्या वाट्यातील काही जागा मंदिरासाठी दान केली. प्रथम महाराजांचा प्रगटदिन साजरा करायचे ठरविले. सन २००६ मध्ये पत्र्याचे शेड उभे करून प्रगटदिन साजरा केला. यात महाराजांना अभिषेक, पूजा, पारायण व झुणका भाकरी यांचा प्रसाद सुरु केला. अतिशय आनंदाने हा उत्सव सोहळा सुरु झाला. आणि याच मुहूर्ताने मंदिराचा पायाभरणी कार्यक्रम झाला. श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव यांचे कार्यकारी अधिकारी श्री शिवशंकर पाटील यांची भेट घेऊन मंदिर उभारणी स्वीकृती व आशीर्वाद घेतला.

२७ फेब्रुवारी २००९ रोजी महाराजांची मूर्ती चौथऱ्यावर विराजमान झाली. महाराजांच्या आदेशानुसार मंदिराचे पूर्ण बांधकाम महाराज स्थानापन्न झाल्या नंतर झाले. आणि तेव्हा पासून आमच्या गावात "श्री" चे उत्सव नेरे मंदिरात सुरु झाले. "श्री महाराजांचे हे मंदिर पनवेल - नेरे -माथेरान रोड वर, पनवेल पासून ७ किलोमीटर अंतरावर नियोजनबद्ध वसलेले आहे. मालडुंगा, धोदानी या बसेस पानवेलमधून आहे तर रेल्वे स्टेशनमधून ७७ व ७९ क्रमांकाची बस उपलब्ध आहे. तसेच सहाआसनी रिक्षा सुद्धा आहेत. सन २०१५ मध्ये "श्री गजानन महाराज मंदिर ट्रस्ट, नेरे" याची धर्मादाय संस्थेमध्ये अधिकृत नोंदणी झाली.

मंदिरात "श्रीं" चा प्रगटदिवस सोहळा, श्री गुरुपुर्णिमा व श्री दत्तजयंती हे प्रमुख सोहळे साजरे होतात. सदर उत्सवात अभिषेक, पारायण, प्रवचन, महाप्रसाद, महाआरती, हरिपाठ, पालखी सोहळा, भजन अभंगवाणी असे विविध कार्यक्रमांचा समावेश असतो. सदर उत्सव हे महाराजांच्या भक्तगणांच्या देणगीतूनच होतात. अनेक संत, महंत, मान्यवर, अतिथी यांची उत्सवाला भेट असते. प.पु. अप्पा माउली (पनवेल) प.पु.बाणूबाई महाराज (गव्हाण कोपर) महंत तपोमुर्ती १००८ श्री श्री वेणाभारती महाराज (नाशिक कपी कुलम पीठ), भारत भूषण गुरुवर्य ह.भ.प गणेश महाराज (रायगड), जगद्गुरू शंकराचार्य विद्याभारती नृसिंह (कोल्हापूर, शंकराचार्य पीठ). यांसारख्या संतांचे आशीर्वाद "श्री" मंदिराला लाभले आहेत.

- श्री दिपक काशिनाथ कन्हेरे (मुख्य विश्वस्त)

कार्यक्रम

दि. ०५.०३.२०२१

गजानन महाराज प्रकटदिन

दि. २३.०७.२०२१

गुरुपौर्णिमा

दि. १८.०७.२०२१

बाल संस्कार वर्ग

संपुर्ण माहिती

दि. १८.१२.२०२१

दत्त जयंती

संपुर्ण माहिती

दि. १३.०७.२०२२

गुरुपौर्णिमा

संपुर्ण माहिती

दि. ०७.१२.२०२२

श्री दत्त जयंती

संपुर्ण माहिती

दि. १३.०२.२०२३

श्रीं चा प्रकटदिन सोहळा

संपुर्ण माहिती

सेवा

अभिषेक व अन्नदान

या सेवा योजनेनुसार कमीत कमी ५०००/- रक्कम ठेवणे आवश्यक आहे. या रक्कमेवर प्रतिवर्षी येणाऱ्या व्याजातून रक्कम ज्यांच्या नावावर ठेवली असेल त्यांच्या नावाने प्रमुख उत्सवात महाराजांना अभिषेक व अन्नदान केले जाईल. रक्कम समक्ष अथवा श्री गजानन महाराज मंदिर ट्रस्ट, नेरे या नावाने चेक द्वारा स्वीकारली जाईल. प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र रक्कम ठेवणे आवश्यक आहे. रक्कम ठेवणाऱ्याने संपूर्ण नाव व पत्ता देणे आवश्यक आहे. तसेच दिलेल्या पत्यामध्ये बदल झाल्यास संस्थेला कळविणे आवश्यक आहे. पत्यामधील बदल कळविताना पावती क्रमांक व तारीख कळवावी. रक्कम स्वतःच्या / नातेवाईकांचे / दिवंगत व्यक्तीचे नावावर ठेवता येईल.

संपर्क: श्री दीपक कन्हेरे (सर)
मोबा: ८१०८९९७३४० / ९०८२८१७८००

फोटोगॅलरी

विश्वस्त मंडळ

श्री. दिपक हिराबाई काशिनाथ कन्हेरे ( मुख्य विश्वस्त )

श्री .रवींद्र सोमनाथ बागुल( मानद विश्वस्त)

श्री .राजेंद्र कांतिभाई पटेल( मानद विश्वस्त)

स्व. हिराबाई काशिनाथ कन्हेरे ( विश्वस्त )

श्री. महेंद्र सुखलाल भावसार( मानद विश्वस्त

श्री. किशोर काशिनाथ कन्हेरे( विश्वस्त)

श्री. संतोष रामविष्णु सत्ते( मानद विश्वस्त)

मंदिर कार्यकारिणी

श्री. मधुकर पुंडलिक म्हात्रे (अध्यक्ष)

सौ.वर्षा बिपीन निकम(उपाध्यक्षा)

कु. जिगर वासुदेव कांबळे( सचिव )

श्री . अभिजित मनोहर गवते ( सहसचिव )

श्री.धिरज प्रल्हादराव नवघरे( खजिनदार)

श्री.अशोक बापु विशे( सहखजिनदार)

कु.अमर अरुण बैंकर ( सदस्य)

कु.योगेश रामचंद्र घनसोलकर ( सदस्य)

कु.सचिन वामन केवारे( सदस्य)

श्री. सुरज विलासराव ठाकरे( सदस्य)

सौ .वनिता हेमंत आमले(सदस्या)

सौ. अलका संजय लाडे ( सदस्या)

श्री.दिनेश काशिनाथ कोळी (लेखापाल)

कु.महेंद्र रामचंद्र पाटील (सदस्य)

कु.सचिन गणपत शेळके( सदस्य)

श्री.हर्षल त्रम्बक तळणीकर( वेबसाईट प्रमुख)

महिला समिती

वर्षा बिपीन निकम ( प्रमुख )

वनिता आमले

दिपाली खिलारी

संगीता चाळके

आरती कदम

अलका लाडे

मीना सावंत

सुजाता मोरे

मनीषा पवार

वैशाली चव्हाण

रुपाली देशमुख

अभिप्राय

संपर्क

आपली मते नोंदविण्यासाठी अथवा संपर्क साधण्यासाठी खालील फॉर्म भरा.

नोंदणीचे प्रमाणपत्र

बँक अकाउंट ची माहिती

अकाउंट नाव : श्री गजानन महाराज मंदिर ट्रस्ट नेरे
मंदिराचा अकाउंट नंबर : 123110210000011
आय फ सी नंबर : BKID0001231
बँक ऑफ इंडिया
शाखा : नेरे